dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मनोरंजन » बोटींग क्लब |
रंकाळा तलाव हे शहराचे कोल्हापूर ऐतिहासिक ठिकाण आहे. रंकाळा तलाव व गार्डन हे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. याचा विचार होऊन रंकाळा तलावाच्या पश्चिम व दक्षिण बाजूस गेली अनेक वर्षे पडीक व दुर्लक्षित जागेवर उद्यान करण्याची संकल्पना आयुक्त श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मांडली. सदर जागेवर उद्यान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक असल्याने शासकीय अनुदान, मा. खासदार, आमदार यांच्या विकास निधीमधून रक्कम उपलब्ध करण्यात आली. .
सदर उद्याना अंतर्गत सध्या अस्तित्वात असणारी झाडे यांचा विचार करून नागरिकांना पायी फिरण्यासाठी ७५० मीटर लांबीचा सिमेंट वॉकवे बांधण्यात आला आहे. या वॉकवेमध्ये दोन ठिकाणी छोटे पूल बांधण्यात आले आहेत. सदर वॉकवे उद्यानाचे क्षे.५ हेक्टर इतके आहे. संपूर्ण पदपथावर लाईट पोल उभारून आकर्षक विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तलावाशेजारी बसण्यासाठी ३००० चौ. मी. चे लॉन करण्यात आले आहे.

या लॉनमध्ये रंगमंच बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करता येणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे , जंगलजीम, सी-सॉ, स्लाईड या सारखी खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्यानामध्ये व लॉनवर विविध प्रकारची आकर्षक प्रकाश योजना करण्यात आली आहे.तसेच वॉकवेच्या दोन्ही बाजूस विविध प्रकारचे वृक्ष, निरनिराळ्या जातीच्या वनस्पती, फुलांचे ताटवे, हिरवळ करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांसाटी व येणा-या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी उद्यानाशेजारी तलावामध्ये, अल्पदरामध्ये बोटींगची सोय करण्यात आलेली आहे.
सदर योजनेसाठी अंदाजे रू ५५ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आर्थक परिस्थितीचा विचार करून यासाठी शासकीय अनुदान, मा. खासदार, आमदार यांच्या विकास निधीमधून रक्कम उपलब्ध करण्यात आली. सदर उद्यान विकासाच्या कामामध्ये मा. आयुक्त यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अल्पावधीत उद्यान विकसित करण्यात आले आहे.
  मुखपृष्ठ
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation